बऱ्याच दिवसांनी आम्ही मित्र नेहमीच्या कॉलेज च्या कट्ट्यावर जमलो होतो. गप्पा रंगत असताना एक मित्र म्हणाला अरे चला, ट्रेकिंगला जाऊया. मग कोणी तोरणा, पुरंदर, पन्हाळा असे नावे घेण्यास सुरवात झाली. तेवढ्यात मी सिंहगड चे नाव घेतले आणि एक मित्र म्हणाला “गड आला पण सिंह गेला”. मग सर्व मित्रांचे या रविवारी सिंहगड ला जायचे ठरले. रविवार उजाडला आणि आम्ही सर्व जण स्वारगेट या पुण्याच्या बस स्थानकावर भेटलो. तेथून आम्ही सिंहगड या किल्ल्यास भेट देण्यासाठी रवाना झालो. स्वारगेट पासून वडगाव – खडकवासला मग तेथून सिंहगड पायथा असा सिंहगडला जाण्याचा मार्ग आहे.
सिंहगड किल्ल्याची माहिती मराठी भाषेमध्ये
सह्याद्री पर्वत रांगेच्या पूर्वेला सिंहगड हा किल्ला आहे. किल्ल्यावर झुंजार बुरूज, छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी, टिळक बंगला, दारूचे कोठार, डोंगीरीचा कडा म्हणजेच तानजी काडा, पुणे दरवाजा आणि कल्याण दरवाजा इत्यादी पाहण्यासारखे ठिकाणे आहेत. कल्याण दरवाजा मार्ग, पुणे दरवाजा मार्ग, पुणे ते सिंहगड गाडीचा रस्ता असे या गडावर जायला तीन मार्ग आहेत. सिंहगड या किल्ल्याचे पूर्वीचे नाव कोंढाणा किल्ला असे होते. सिंहगड या किल्लाला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. या गडावरुन आपल्याला पुरंदर, राजगड, तोरणा, पन्हाळा, विसापुर, लोहगड हे गड पाहण्यास मिळतात.
मजकूर मालिका:
Table of Contents
सिंहगडावर तुम्ही कसे पोहोचाल?
पुण्याला येण्यासाठी विमानाने
आपण पुण्याच्या विमानतळावर उतरून तेथून पुणे च्या खाजगी बस मध्ये बसून स्वारगेट ला उतरू शकता. तेथून महाराष्ट्र शासनाची बस ने आपण गडाच्या पायथ्याशी पोहचू शकता. पुण्याच्या विमानतळापासून स्वारगेट हे अंतर १३ किलोमीटर आहे. तसेच स्वारगेटपासून सिंहगड या किल्लाचे अंतर ३६ किलोमीटर आहे.
खाजगी वाहन
आपण खाजगी वाहनाने सुद्धा किल्ल्या वरती जाऊ शकता. किल्ल्यावरती पार्किंगची सुद्धा सोय आहे. पार्किंग साठी वनविभाग आपल्याकडून दुचाकी साठी २० रुपये तर चारचाकी साठी ५० रुपये शुल्क घेते.
महाराष्ट्र शासनाची बस
बस ने सुद्धा किल्ला वरती जाता येते. स्वारगेट या बस स्टँड च्या ५० नंबरच्या प्लॅटफॉर्म वर सिंहगड या गडावर जाण्यासाठी बस थांबते. बस ची सुविधा कोंढणपुर या गावापर्यंत आहे. तेथून खाजगी वाहनाने गडाच्या पायथ्याशी म्हणजेच कल्याण या गावी उतरून आपण गडावर प्रवेश करू शकतो.
गडाचे सिंहगड हे नाव कसे पडले?
सिंहगड या किल्लाचे जुने नाव कोंढाणा असे होते. सिंहगड हा किल्ला पुरंदरच्या तहामध्ये मुघल यांच्याकडे होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला परत घेण्याचे ठरवले. स्वराज्याचे सुभेदार तानजी मालुसरे हे आपल्या मुलाचे लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी राजगडावर गेले होते. त्यावेळेस महाराज सिंहगडाच्या स्वारीच्या आखणीमध्ये व्यस्त होते. परंतु सुभेदार यांना ही बातमी समजताच एका क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी महाराजांची भेट घेतली आणि आधी लगीन कोंढाणाचे मग माझ्या रायबाचे असे वाक्य उदगारून कोंढाणा जिंकण्यासाठी कूच केले. कोंढाणा किल्ला लढत असताना सुभेदार तानाजी मालुसरे यांना वीरमरण आले. हि बातमी महाराजांना कळताच त्यांच्या तोंडून शब्द निघाले, “गड आला पण सिंह गेला”. या घटनेवरून महाराजांनी कोंढाणा या किल्लाला ‘सिंहगड’ असे नाव दिले. यानंतर महाराजांनी स्वत: सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या गावी जाऊन रायबाचे लग्न लाऊन दिले.
सिंहगड किल्ल्यावरती पाहण्यासारखे ठिकाण :
खांद कडा
पुणे दरवाज्यातून प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूस खांद कडा आहे. येथे बुरूज आणि तटबंदी आहे. खांद कड्याच्या समोर कल्याण दरवाजा आहे.
दारुगोळ्याचे कोठार
तोफखाण्यासाठी दारुगोळा लागत असे त्याची साठवण ठेवण्यासाठी दारुगोळा कोठाऱ्याचा उपयोग होत असे.
छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी
छत्रपती राजाराम महाराजांनी मुघलांनशी ११ वर्षे लढून शेवटी याच किल्ल्यावरती शेवटचा श्वास घेतला. छत्रपती राजाराम महाराजांची समाधी, हि राजस्थानच्या घुमती देवळासारखी दिसते. अवघ्या ३० व्या वर्षी छत्रपती राजाराम महाराज यांचे निधन झाले.
टिळक बंगला
लोकमान्य टिळक यांचे निवासस्थान याच किल्ल्यावर होते. गांधी आणि लोकमान्य टिळक यांची भेट याच किल्ल्यावर झाली होती. टिळक यांनी हे निवासस्थान रामलाल नाईक यांच्याकडून विकत घेतले होते. त्यांनी या बंगल्यावरती काही ग्रंथ सुद्धा लिहलेले आहेत.
सुभेदार तानाजी मालुसरे यांचे स्मारक
हा किल्ला मुघलांकडे होता. तो परत मिळवण्यासाठी सुभेदार तानाजी मालुसरे यांनी आपल्या प्राणांची आहुति दिली. त्यांची आठवण म्हणून किल्ल्यावर स्मारक बांधले. हा किल्ला सुभेदार तानाजी लढत असताना त्यावेळी या किल्ल्यावर मुघल फौज जास्त होती. त्यामुळे सुभेदार तानाजी गडाच्या पश्चिमेचा अवघड असणारा डोणगिरीचा कडा यावरून गडावर चढले होते आणि हा किल्ला काबिज केला होता.
झुंजार बुरूज
सिंहगड चे दक्षिण टोक म्हणजे झुंजार बुरूज होय.
डोणगिरिचा उर्फ तानाजी कडा
हा तानाजी कडा गडाच्या पश्चिमेस आहे. या कडेवरुण सुभेदार तानाजी मालुसरे आपल्या मावळासह किल्ल्यावर चढले होते.
गडावरील मंदिरे
कोंढाणेश्वर
हे मंदिर यादव कालीन असून ते यादवांचे कुलदैवत आहे. हे शंकराचे मंदिर असून त्यात एक पिंड आणि सांब असणारे मंदिर आहे.
अमृतेश्वर
हे भैरवाचे मंदिर आहे. या मंदिरात भैरव आणि भैरवी अशा दोन मूर्ती आढळतात. यादवांचे आधी कोळयांची वस्ती या गडावर होती.
किल्ल्याचे भौगोलिक स्थान
हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारात येत असून सिंहगड हा किल्ला पुण्यापासून ३५ किलोमीटर अंतरावर आहे. सिंहगड हा किल्ला समुद्र संपाटीपासून सुमारे ४४०० फुट उंच आहे. भुलेश्वरच्या रांगेवर हा गड आहे. या गडावर दुरदर्शनचा मनोरा उभारलेला आहे. सिंहगड या किल्ल्याचे जुने नाव कोंढाणा असे होते.
किल्ल्यावर जाणाऱ्या वाट
पुणे-कोंढणपुर
स्वारगेट पासून बस ने कोंढणपुरला उतरून तेथून खाजगी वाहनाने आपण सिंहगडला जावू शकता.
कल्याण दरवाजा
कोंढणपुर पासून सिंहगड च्या पायथ्याशी म्हणजेच कल्याण या गावी उतरून आपण गडावर प्रवेश करू शकतो. येथे दोन दरवाजे असून या दरवाज्यातून आत गेल्यावर हत्ती आणि माहूत असे दोन दगडी शिल्पे आहेत. तसेच या दरवाज्यावर शिलालेख सुद्धा आढळतो.
पुणे दरवाजा
खडकवासच्या धरणाच्या लगत येऊन आपण या दरवाज्यातून गडावर प्रवेश करू शकतो.
सिंहगड किल्ल्याचा इतिहास
सिंहगड किल्ला हा पूर्वी आदिलशाहीत होता. दादोजी कोंडदेव हे या किल्लाचे सुभेदार होते. पुढे दादोजी यांचे निधन झाल्यावर आदिलशाहीने सिद्धी अंबर ला सुभेदार केले. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी सिद्धी अंबर कडून हा किल्ला जिंकून घेतला होता. पुरंदरच्या तहा मध्ये हा किल्ला मुघल यांना देण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्राहून सुटका झाल्यावर हा किल्ला जिंकून घेण्याचे ठरवले. त्यासाठी तानाजी यांची निवड करण्यात आली होती. तानाजी यांना किल्ला जिंकून घेत असताना वीरमरण आले आणि छत्रपतींनी या किल्ल्याला सिंहगड असे नाव दिले.
[…] अधिक वाचा: सिंहगड किल्ल्याची माहिती मराठी भाषेम… […]