सिंहगड किल्ला हा पुण्याजवळील सर्वात प्रसिद्ध किल्ल्यांपैकी एक आहे. बरेच हौशी पर्यटक ट्रेकिंग करण्यासाठी या किल्ल्यावर येत असतात. सिंहगडावर ट्रेकिंग करण्याआधी काही प्रश्न आणि त्याची सविस्तर उत्तरे येथे दिलेली आहेत. सिंहगडावर जाण्याची सर्वोत्तम वेळ, किल्ल्यावर कसे पोहोचायचे आणि तिथे काय बघायचे हे जाणून घेण्यासाठी खालील प्रश्न नक्की वाचा. तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल.
खाली दिलेली उत्तरे तुम्हाला तुमच्या भेटीचे नियोजन सहजतेने करण्यास मदत करतील. तुम्ही पहिल्यांदाच प्रवास करत असाल तर ही प्रश्नावली तुम्हाला उत्कृष्ठ मार्गदर्शक ठरेल.
Sinhagad Fort FAQs in Marathi
सिंहगडाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी नक्की वाचा: सिंहगड किल्ल्याची संपूर्ण माहिती मराठी भाषेमध्ये
सिंहगड चढायला किती वेळ लागतो?
सिंहगड चढण्यासाठी दोन मार्ग आहेत आणि या दोन्ही मार्गाने गडावर जाण्यासाठी एक ते दोन तास लागू शकतात. परंतु गडावर जात असताना आजूबाजूच्या परिसरातील झाडे झुडपे डोंगर धबधबे इत्यादी गोष्टींचा आनंद घेत तुम्हाला गडावर चढण्यासाठी दोन ते तीन तास लागू शकतात.
सिंहगडावर कोणाची समाधी आहे?
स्वराज्याचे सुभेदार तानाजी मालुसरे यांची समाधी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरे यांच्या स्मरणार्थ या गडाचे नाव सिंहगड असे ठेवले यापूर्वी या गडाचे नाव कोंढाणा असे होते.
सिंहगड ट्रेक किती किलोमीटर आहे?
पुण्याच्या लोकांसाठी या गडाचा ट्रेक खूप लोकप्रिय आहे. या गडाचा ट्रेक २.७ किलोमीटर एवढा आहे.
सिंहगड गडाला भेट देण्यासाठी दिवसाचा सर्वोत्तम वेळ कोणता आहे?
या गडाला भेट देण्यासाठी सकाळी ५ ते ७ वाजताची वेळ योग्य आहे.
सिंहगडला कसे जायचे?
पुण्यापासून या गडाचे अंतर २४ किलोमीटर एवढे आहे. तुम्ही या गडावरती बाइक ने टॅक्सी ने किंवा प्रायवेट गाडीने जावू शकता.
सिंहगडाचे पूर्वीचे नाव काय होते?
या गडाचे पूर्वीचे नाव कोंढाणा असे होते. स्वराज्याचे सुभेदार तानाजी मालुसरे यांना या गडावरती लढाईमद्धे वीरमरण आले होते यामुळे महाराजांनी या गडाचे नाव सिंहगड असे ठेवले होते.
सिंहगडावर जाण्यासाठी किती पायऱ्या आहेत?
सिंहगडावर जाण्यासाठी सुमारे २५० पायऱ्या आहेत.
सिंहगड ट्रेक किती कठीण आहे?
सिंहगड ट्रेक हा सोपा ते मध्यम गटात येतो. तुम्ही जर पहिल्यांदाच जाणार असाल तर तुम्हाला हा ट्रेक नक्कीच आव्हानात्मक होईल.
स्वारगेट ते सिंहगड गडाचे बस तिकीट किती आहे?
स्वारगेट ते सिंहगड बस तिकीट सुमारे ३० ते ५५ रुपये इतके आहे. ही बस तुम्हाला गडाच्या पायथ्याला असलेल्या गावात पोहोचवेल. या गावातून गडाच्या पायथ्याला जाण्यासाठी तुम्हाला खाजगी वाहने उपलब्ध आहेत.