सह्याद्री पर्वतरांगेत उंच बांधलेली छत्रपती शिवाजी महाराजांची स्वप्नातील राजधानी म्हणजे रायगड. जावळीच्या घनदाट खोऱ्यात वसलेला रायगड हा केवळ दगडी भिंती नसून मराठ्यांच्या इतिहासाची सार्थ ग्वाही देणारा गड आहे. १६७४ मध्ये, छत्रपती शिवाजी महाराजांनी येथे स्वतःला मराठा साम्राज्याचा राजा म्हणून राज्याभिषेक केला.
रायगडाची चढाई खूप तीव्र आहे, परंतु येथील प्रत्येक पाऊल इतिहासातून चालल्यासारखे वाटते. गडावरून सर्व बाजूंनी दऱ्या अविरतपणे पसरलेल्या आहेत, ज्या पर्यटकांना मराठ्यांच्या वैभवाची आठवण करून देतात. रायगड अजूनही शौर्य, दूरदृष्टी आणि मराठा शक्तीच्या उदयाच्या कहाण्या सांगतो. याच दुर्गदुर्गेश्वर रायगडबद्दल सतत विचारले जाणारे प्रश्न आणि त्याची सविस्तर उत्तरे येथे दिलेली आहेत.
Raigad Fort FAQs in Marathi
रायगड किल्ल्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी वाचा:
रायगड किल्ला चढण्यासाठी किती वेळ लागतो?
रायगड किल्ल्याचा ट्रेक हा मध्यम ते कठीण पातळीमध्ये येतो. त्यामुळे रायगड किल्ला चढण्यासाठी दोन ते तीन तास लागतात. या किल्लावर सुमारे १७३७ पायऱ्या आहेत परंतु ज्यांना ट्रेकिंगला जाता येत नसेल त्यांच्यासाठी रोपवेची सुविधा उपलब्ध आहे.
शिवाजी महाराजांनी रायगड किल्ला कधी जिंकला?
१६६५ साली महाराजांनी हा किल्ला चंद्रराव मोरे यांच्याकडून जिंकला होता.
रायगडचे जुने नाव काय होते?
रायरी असे या किल्ल्याचे जुने नाव होते.
रायगड रोपवेचे तिकीट दर किती आहे?
तीन पेक्षा कमी वय असणाऱ्या मुलांसाठी हे रोपवे फुकट आहे. ३ ते ९ दरम्यान वय असणाऱ्या व्यक्तींसाठी २१० रुपये ९ वर्षाच्या पुढील व्यक्तींसाठी ३१५ रुपये इतके रायगड किल्ल्यावरील रोपवेचे तिकीट दर आहे.
रायगडावरील एक प्रसिद्ध टोक कोणते आहे?
टकमक टोक हे रायगडावरील प्रसिद्ध टोक आहे.
रायगडाला एकूण किती दरवाजे आहेत?
रायगड या गडाला चार दरवाजे आहेत महादरवाजा, नगारखाना दरवाजा, पालखी दरवाजा इत्यादी
रायगड कधी बांधला?
१६७४ मध्ये रायगड हा किल्ला बांधला आहे.
रायगड किल्ल्यापासून जवळचे स्टेशन कोणते आहे?
रायगड किल्ल्याच्या सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन माणगाव आहे, जे सुमारे रायगड किल्ल्यापासून २८ किमी अंतरावर आहे.