पुरंदर किल्ल्याला भेट देण्यापूर्वी तुमचे अनेक प्रश्न असतील. पुरंदर किल्ल्याबद्दलच्या वारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि त्याची थोडक्यात उत्तरे मराठी भाषेमध्ये येथे दिलेली आहेत त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. पुरंदर हा किल्ला इतिहास प्रेमी आणि ट्रेकर्ससाठी एक प्रसिद्ध ठिकाण आहे. पुरंदर किल्ल्याला तुम्ही पहिल्यांदाच भेट देत असाल किंवा त्याबद्दल उत्सुक असाल तर हे वारंवार विचारले जाणारे प्रश्न तुम्हाला मार्गदर्शन करतील.
Purandar Fort FAQs in Marathi
पुरंदर किल्ल्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी वाचा: पुरंदर किल्ला
पुरंदर गडाचा इतिहास काय आहे?
पुरंदर गडावरती स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म १४ मे १६५७ साली झाला होता.
पुरंदर गडाची उंची किती आहे?
पुण्याच्या आग्नेयेस ५० किलोमीटर पश्चिम घाटात पुरंदर हा किल्ला समुद्रसपाटीपासून १,३७४ मीटर (४,५०८ फूट) उंचीवर आहे.
पुरंदरच्या तहात छत्रपती शिवाजी महाराजांना किती किल्ले द्यावे लागले होते?
पुरंदरच्या तहात छत्रपती शिवाजी महाराजांना २३ किल्ले मुघलांना द्यावे लागले होते.
पुरंदर गडावर कोणाचा जन्म झाला?
पुरंदर गडावर स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म झाला होता.
पुरंदर किल्ल्याचा किल्लेदार कोण होता?
मुरारबाजी देशपांडे हे पुरंदर गडाचे किल्लेदार होते. त्यांनी दिलेरखानाच्या फौजेविरुद्ध शूरपणे लढा देऊन या किल्ल्याचे रक्षण केले.
पुरंदर किल्ला कशासाठी प्रसिद्ध आहे?
स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर झाला होता.
पुरंदरचा वेढा आणि मुघल बादशाहाशी तह कधी झाला?
११ जून १६६५ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि मुघल सरदार मिर्झा राजे जयसिंग यांच्यात पुरंदरचा तह झाला होता.