लोहगड हा पुण्याच्या साधारण उत्तरेला असणारा किल्ला. लोहगड हा पुणेकरांच्या अगदी आवडता असलेला किल्ला होय. दरवर्षी पावसाला चालू झाला कि पावले आपोआप लोहगडाकडे वळायला लागतात. सिंहगड सारखाच ट्रेकिंग करणाऱ्यांचा लोहगड हा आवडता किल्ला आहे. इतिहासाचा वारसा असलेला लोहगड आणि त्यावरील विंचु कडा म्हणजे पुणे आणि मुंबई जवळील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ.
नुकताच लोहगडावर जाण्यासाठी नाममात्र प्रवेशमूल्य आकार चालू केला आहे. ज्याचा उपयोग गडाच्या डागडुजी आणि इतर कामासाठी करण्यात येणार आहे.
लोहगडावर विंचुकडा, उलटा धबधबा, हनुमान दरवाजा, गणेश दरवाजा, नारायण दरवाजा, महादरवाजा अशी पाहण्यासारखे ठिकाणे आहेत.
लोहगडावर जाण्यासाठी तुम्ही खाजगी वाहनाने तसेच रेल्वेने सुद्धा जाऊ शकता. पुणे स्टेशन वरून निघणारी पुणे-लोणावळा लोकल ट्रेन हि लोणावळा च्या आधीच्या मळवली स्टेशन वर थांबते. आणि इथूनच तुम्ही लोहगड किल्ल्याच्या ट्रेकिंग ला सुरुवात करू शकता. लोहगड हा किल्ला स्वारगेटपासून ६५ किलोमीटर अंतरावर आहे.
लोहगडला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. लोहगड किल्ल्याचा उपयोग छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवरून आणलेला खजिना साठवण्यासाठी केला होता.
लोहगडाचा ऐतिहासिक वारसा
मुघल बादशाह औरंगजेब याने आपला मामा शाहिस्तेखान याला स्वराज्यावर चाल करण्यासाठी पाठवले होते. त्याने पुण्याचा लालमहाल आपल्या ताब्यात घेतला. पुण्यात राहत असताना तीन वर्ष त्याने स्वराज्याचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान केले. पुण्यातून शाहिस्तेखानाला आणि मुघल सैन्याला हाकलून देण्यासाठी केलेल्या योजनेमध्ये शाहिस्तेखान थोडक्यात वाचला आणि पळून गेला. या झटापटीत मात्र त्याची ३ बोटे तुटली. शाहिस्तेखानाने केलेल्या नुकसानीचा वचपा काढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांच्या ताब्यात असलेल्या सूरतेवर स्वारी केली. त्याकाळी सूरत हे शहर वैभवशाली आणि समृद्ध होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी भरपूर प्रमाणात खजिना लुटून स्वराज्यात आणला. हा सर्व खजिना लोहगडावर सुरक्षित ठेवला होता.
लोहगडला जाण्यासाठी मार्ग
पुणे स्टेशन वरून निघणारी पुणे-लोणावळा लोकल ट्रेन हा लोहगड किल्ल्याला भेट देण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. पुण्यावरून निघाल्यावर लोणावळाच्या आधी मळवली स्टेशन ला उतरून तुम्ही ट्रेक चालू करू शकता. मळवली स्टेशन ला उतरून तिथून खाजगी वाहनाने लोहगडवाडीला जाण्याची देखील सोय आहे. लोहगडवाडीच्या जवळच विसापूरचा किल्ला देखील आहे. मळवली पासून लोहगड हा किल्ला ५ किमी अंतरावर आहे.
खाजगी वाहनाने सुद्धा किल्ल्यावर जाता येते. त्यासाठी लोहगडवाडी या गावी जावे लागते. पावसाळा मध्ये लोहगड किल्ल्याला भरपूर हौशी पर्यटक भेट देतात. त्यामुळे गाडी पार्किंग करणे डोकेदुखी बनू शकते. शक्यतो खाजगी वाहनाने लोहगड ला येणे टाळावे.
लोहगडावर पाहण्यासारखे ठिकाण
गणेश दरवाजा
गणेश दरवाजा प्रथम दर्शनी असून असे गडावर चार दरवाजे आहेत. गणेश दरवाज्याच्या आतील बाजूस शिलालेख आढळतात.
नारायण दरवाजा
या दरवाज्याच्या जवळ एक भुयार आहे. या भूयारामध्ये नाचणी, भात साठवून ठेवला जात असावा. नारायण दरवाजा नाना फडणविसांनी बांधून घेतला होता.
हनुमान दरवाजा
हनुमान दरवाजा लोहगडाचा सर्वात प्राचीन दरवाजा आहे.
महादरवाजा
महादरवाजा हा गडाचा मुख्य दरवाजा आहे.
लक्ष्मी कोठी
छत्रपती शिवाजी महाराज यांनी १६६४ साली सूरत या शहरावर स्वारी केली. या स्वारी मध्ये महाराजांनी भरपूर प्रमाणात खजिना लुटलेला होता. हा खजिना राजगडावर घेऊन येत असताना स्वराज्याचे सेनापती नेतोजी पालकर यांच्या अधिपत्याखाली तो या कोठीत ठेवण्यात आला होता. लक्ष्मीकोठी ही दगडामध्ये कोरलेली गुहा आहे.
सोळा कोणी तलाव
या तलावाला १६ कोण आहेत. या तलावातील पाण्याचा उपयोग पिण्यासाठी आणि दैनंदिन वापरासाठी होत असे.
विंचू कडा
या गडावरील विंचु कडा हा सेल्फी साठी खूप प्रसिद्ध आहे. बरेच तरुण मंडळी या ठिकाणी येऊन सेल्फी काढत असतात. विंचु कडा ही एक माची आहे. लोहगडावरून या माचीला पाहिले असता ती विंचवाच्या नांगीसारखी दिसते म्हणून तीला विंचु कडा असे म्हणतात.
घोड्याची पागा
लोहगडावर घोडे ठेवण्यासाठी घोड्याच्या पागाचा उपयोग होत असे.
बावनटाके
या टाकीचा उपयोग गडावर पिण्याच्या आणि वापराच्या पाणीसाठ्यासाठी होत असे. ही गडावरील सर्वात मोठी टाकी आहे.
शंकराचे मंदिर
या गडावरती अतिप्राचीन असे शंकराचे मंदिर आहे.
Banner image by Shuma Talukar
[…] […]