भारताच्या पश्चिमेकडे असणारी उत्तर-दक्षिण जाणारी सह्याद्री पर्वतरांग हे किल्ल्यांचे एक मोहोळ म्हणावे लागेल. सह्याद्री रांगेमध्ये असंख्य ऐतिहासिक किल्ले पाहायला मिळतात. आज आपण पुणे आणि मुंबई पासून जवळ असणाऱ्या निवडक १० किल्ल्यांची माहिती घेवूयात.
संक्षिप्त :
- लोहगड, स्वराज्याची तिजोरी
- सिंहगड, पुणे जहागीरीतील महत्वाचा किल्ला
- तोरणा किल्ला, पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच किल्ला
- शिवनेरी किल्ला, शिवाजी महाराजांच जन्मस्थळ
- पुरंदर किल्ला, संभाजी महाराजांच जन्मस्थळ
- रायगड, स्वराज्याची राजधानी
- प्रतापगड, आदिलशाहीवर कायमची जरब बसवली
- तीकोना किल्ला, तीन कोनी किल्ला
- रोहिडा किल्ला, बाजीप्रभू देशपांडे यांची स्वराज्य कार्याला सुरुवात
- राजमाची किल्ला, निसर्गातील नंदनवन
लोहगड | Lohagad fort information in Marathi Language
पुण्यापासून लोहगड अगदी जवळ म्हणजे सुमारे ६५ किमी अंतरावर आहे. हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारात येत असून तो पुण्याच्या उत्तरेला आहे. लोहगड हा किल्ला ट्रेकिंग च्या दृष्टीने अगदी सोपा आहे. विंचु कडा हा लोहगडावरील प्रसिद्ध कडा असून तो सेल्फी काढण्यासाठी प्रसिद्ध आहे. खास सेल्फी काढण्यासाठी लोक येथे येत असतात. लोहगडावर नारायण दरवाजा, हनुमान दरवाजा, लक्ष्मी कोठी, महादरवाजा अशी पाहण्यासारखी ठिकाणे आहेत.
लोहगडावर आपण लोकल ट्रेनने जावू शकतो. तसेच खाजगी वाहनाने सुद्धा लोहगडावर जाण्याची सोय आहे. पुणे-लोणावळा जाणाऱ्या लोकल मध्ये आपण बसलातकी लोणावळाच्या आधी मळवली या रेल्वे स्थानकावर उतरावे लागते. मळवली च्या स्थानकापासून आपण ट्रेकिंग करत गडावर जाऊ शकतो.
अधिक वाचा: लोहगड किल्ल्याला भेट देण्याआधी या गोष्टींची माहिती जाणून घ्या.
सिंहगड | Sinhagad fort information in Marathi Language
सिंहगड किल्ल्याचे जुने नाव कोंढाणा असे होते. मार्च १६७० मध्ये झालेल्या कोंढाणा किल्ल्याच्या लढाई मध्ये सुभेदार तानाजी मालुसरे यांना वीरमरण आले. “गड आला पण सिंह गेला” असे वाक्य छत्रपती शिवाजी महाराजांनी उदगारून या गडाला सिंहगड असे नाव दिले. सिंहगड हा किल्ला सह्याद्री रांगेच्या पूर्वेला असून तो पुण्यापासून ३० किमी अंतरावर आहे. सिंहगडावर झुंजार बुरूज, छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी, टिळक बंगला, तानाजी कडा अशी पाहण्यासारखी ठिकाणे आहेत. खाजगी वाहनाने सिंहगडावर जाण्याची सोय आहे.
अधिक वाचा: सिंहगड किल्ल्याची माहिती मराठी भाषेमध्ये
तोरणा | Torna fort information in Marathi Language
पुणे जिल्ह्यात असणाऱ्या किल्ल्यांमधला सर्वात उंच असा असणारा हा किल्ला म्हणजे तोरणा किल्ला. म्हणूनच तोरणा किल्ल्याला गरुडाचे घरटे असे देखील म्हणतात. तोरणा किल्ला जिंकून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे तोरण बांधले. प्रचंडगड असे नाव असलेला हा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधल्यामुळे या किल्ल्याला तोरणा असे नाव दिले गेले. हा किल्ला पुण्यापासून सुमारे ५० किमी अंतरावर आहे. अवघ्या १७ व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या निवडक सवंगड्यासह हा किल्ला जिंकला होता. ट्रेकिंग च्या दृष्टीने हा किल्ला काहीसा अवघड मानला जातो.
Read more: Top 14 Toughest and Most Difficult treks in Maharashtra
शिवनेरी | Shivneri fort information in Marathi Language
स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म या शिवनेरी किल्ल्यावर झाला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच बालपण याच किल्ल्यावर गेलं. शिवनेरी किल्ल्यावर महादेवाचे मंदिर आहे. जुन्नर तालुक्यातील शिवनेरी हा पुण्यापासून सुमारे ९४ किमी अंतरावर आहे. ट्रेकिंग च्या दृष्टीने हा किल्ला अगदी सोपा आहे.
Read more: Trekking Bags: Top 5 budget trekking backpacks (Handpicked)
पुरंदर | Purandar fort information in Marathi Language
स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांचा जन्म या किल्ल्यावर झाला होता. तसेच पेशवेकाळात हा किल्ला स्वराज्याची राजधानी सुद्धा होती. पुण्यापासून सुमारे ३७ किमी अंतरावर असणाऱ्या या किल्ल्यावर जायला खाजगी वाहनाची सोय आहे. पुरंदर किल्ल्यावर बिनी दरवाजा, खंद कडा, शेंदऱ्या बुरूज, पुरंदर माची, भैरव खिंड, वीर मुरारबाजी यांचा पुतळा अशी पाहण्यासारखी ठिकाणे आहेत. पुरंदर हा किल्ला ट्रेकिंग च्या दृष्टीने सोपा आहे.
Read more: Top 10 Best Treks near Pune and Mumbai to visit in 2021
रायगड | Raigad fort information in Marathi Language
कर्तव्यनिष्ठ हिरोजी इंदुलकर यांच्या देखरेखीत बांधलेला रायगड हा किल्ला स्वराज्याची राजधानी होती. रायगडाचे पूर्वीचे नाव होते रायरी चा किल्ला. १६७४ साली छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक याच किल्ल्यावर झाला होता. रायगड या किल्ल्याला चारही बाजूंनी संरक्षण होते. त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगडावरून रायगडावर स्वराज्याची राजधानी हलवली.
रायगड हा किल्ला पुण्यापासून सुमारे १३२ किमी अंतरावर आहे. या किल्ल्यावरती राजमाता जिजाबाईंचा वाडा, नाना दरवाजा, मदार मोर्चा, महादरवाजा, चोर दिंडी, हत्तीतलाव, गंगा सागर तलाव, स्तंभ, पालखी दरवाजा, मेणा दरवाजा, राजसभा अशी पाहण्यासारखी ठिकाणे आहे. दरवर्षी अगदी उत्साहाने छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन रायगडावर साजरा केला जातो.
Read more: Things you should know before visiting Harishchandragad & Kokankada
प्रतापगड | Pratapgad fort information in Marathi Language
प्रतापगडाचा प्रताप जेवढा सांगावा तेवढा कमीच. याच किल्ल्याच्या पायत्याशी आदिलशाहीतील शक्तिवान असा अफजल खानाचा वध छत्रपती शिवाजी महाराजांनी अगदी कल्पकतेने केला होता. प्रतापगडाला दर वर्षी असंख्य पर्यटक भेट देतात. सातारा जिल्ह्यात असणारा प्रतापगड हा पुण्यापासून सुमारे १३८ किमी अंतरवर आहे. हा किल्ला ट्रेकिंग च्या दृष्टीने अगदी सोपा आहे.
Read more: Best Trekking Shoes for Men
तीकोना | Tikona fort information in Marathi Language
पूर्वीचा वितंडगड म्हणून ओळख असलेल्या या किल्ल्याचा आकार हा त्रिकोणा सारखा असल्याने, तीन कोण असलेला किल्ला तीकोना म्हणून ओळखला जातो. मावळ भागातील एक प्रमुख किल्ला म्हणून तीकोना किल्ल्याकडे पाहतात. अगदी सहज ट्रेकिंग करता येईल असा हा किल्ला आहे. तीकोना किल्ला पुण्यापासून सुमारे ५१ किमी अंतरावर आहे. या किल्ल्यावरती सात पाण्याच्या टाक्या, सातवाहन काळातील लेणी आणि शेजारीच असणारं पवना धरण अशी पाहण्यासारखी ठिकाणे आहेत.
Read more: Things you should know before visiting Kalavantin Durg (Panvel)
रोहिडा किल्ला | Rohida fort information in Marathi Language
बांदल-देशमुखांचा पाडाव करून मराठ्यांनी हा किल्ला स्वराज्यात आणला. रोहिडा किल्ल्याला विचित्र गड असे देखील म्हणतात. यादव काळात बांधलेला हा किल्ला पुण्यापासून सुमारे ६६ किमी अंतरावर आहे. हा किल्ला ट्रेकिंग च्या दृष्टीने अगदी सोपा आहे. या किल्ल्यावरती शिरवाले बुरूज, पाटणे बुरूज, वाघजाई बुरूज, फत्ते बुरूज अशी पाहण्यासारखी ठिकाणे आहेत.
Read more: Things you should know before visiting Harihar Fort (Nashik)
राजमाची किल्ला | Rajmachi fort information in Marathi Language
स्वराज्यामधील एक ऐतिहासिक किल्ला अशी राजमाची किल्ल्याची ओळख आहे. राजमाची टेकडी वर श्रीवर्धन आणि मनरंजन असे २ किल्ले पाहायला मिळतात. त्या भोवती विस्तीर्ण अशी माची आहे. पुण्यापासून हा किल्ला सुमारे १६८ किमी अंतरावर आहे. ट्रेकिंग च्या दृष्टीने अगदी सोपा असणाऱ्या राजमाची किल्ल्यावर मान्सून काळात पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते.