पुणे आणि मुंबई जवळील

BIT संघ

प्रसिद्धीदिन जुलै १०, २०२१

१० उत्कृष्ट किल्ले 

सह्याद्री पर्वतरांगेमध्ये असंख्य किल्ल्यांचे अगदी मोहोळच आहे. या डोंगरदऱ्यातील रानावनातील दुर्गम किल्ल्यांनी स्वराज्यस्थापनेत खूप मोलाची जबाबदारी पार पाडली आहे. 

१. लोहगड, स्वराज्याची तिजोरी

सुरतेवरून आणलेला खजिना छत्रपती शिवाजी महाराजांनी लोहगड किल्ल्यावर सुरक्षित ठेवला होता.

Rashmi.parab

२. सिंहगड, पुणे जहागीरीतील महत्त्वाचा किल्ला 

सिंहगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव होते कोंढाणा किल्ला. सरदार तानाजी मालुसरे यांनी मार्च १६७० मध्ये कोंढाणा किल्ला जिंकला ज्यात त्यांना वीरमरण आले. "गड आला पण सिंह गेला " हे उद्गार त्या क्षणाची आठवण करून देतात.

३. तोरणा किल्ला, पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच किल्ला 

गरुडाचे घरटे अशी ओळख असणारा तोरणा किल्ला जिंकून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे तोरण बांधले. तोरणा किल्ल्याचे जुने नाव प्रचंडगड असे होते.

Sopan Patil

४. शिवनेरी किल्ला, शिवाजी महाराजांच जन्मस्थळ

स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला होता. शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात असून तो पुण्यापासून सुमारे ९४ किमी अंतरावर आहे.

Himanshu Sarpotdar

५. पुरंदर किल्ला, संभाजी महाराजांच जन्मस्थळ

स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर झाला. पुरंदर किल्ला आणि वज्रगड किल्ला असे दोन किल्ले हे एकाच डोंगर सुळक्यावर आहेत.

Dinesh Valke

६. रायगड, स्वराज्याची राजधानी

कर्तव्यनिष्ठ हिरोजी इंदुलकर यांच्या देखरेखीत बांधलेला रायगड हा किल्ला स्वराज्याची राजधानी होती. रायगडाचे पूर्वीचे नाव होते रायरी चा किल्ला. १६७४ साली छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक याच किल्ल्यावर झाला होता.

Sagar Gandhre

७. प्रतापगड, आदिलशाहीवर कायमची जरब बसवली

प्रतापगडाच्या पायत्याशी आदिलशाहीतील शक्तिवान असा अफजल खानाचा वध छत्रपती शिवाजी महाराजांनी अगदी कल्पकतेने केला होता.

Shivajidesai29

८. तीकोना किल्ला, तीन कोनी किल्ला

तीकोना किल्ल्याचे पूर्वीचे नाव वितंडगड असे होते. किल्ल्याचा आकार त्रिकोणी असल्याने या किल्ल्याला नंतर तीकोना किल्ला म्हणून ओळखू लागले.

Shreyank Gupta

९. रोहिडा किल्ला, बाजीप्रभू देशपांडे यांची स्वराज्य कार्याला सुरुवात

बांदल-देशमुख यांचा पाडाव करून शिवाजी महाराजांनी रोहिडा किल्ला स्वराज्यात आणला. बांदलांकडील सरदार बाजीप्रभू देशपांडे हे देखील या लढाई नंतर स्वराज्य सेवेत रुजू झाले.

Ccmarathe

१०. राजमाची किल्ला, निसर्गातील नंदनवन

राजमाची टेकडी वर श्रीवर्धन आणि मनरंजन असे २ किल्ले पाहायला मिळतात आणि त्या भोवती विस्तीर्ण अशी माची आहे

Bajirao